This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद.*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद.

बेळगाव तारीख 31 मध्यप्रदेश शिवपुरी येथील सरस्वती विद्यापीठ आवासीय विद्यालय शाळेच्या मैदानावर विद्याभारती अखिल भारतीय संघटना आयोजित अखिल भारतीय स्तरावरील प्राथमिक मुलींच्या हँडबॉल
स्पर्धेत दक्षिण मध्यक्षेत्रचे प्रतिनिधित्व करीत सहभाग झालेल्या अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने विजेतेपद पटकाविले तर माध्यमिक मुलींच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत प्राथमिक मुलींच्या
गटात उपांत्यपूर्व लढतील संत मीरा शाळेने पूर्वी उत्तरप्रदेशचा 5-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या मेघा कलखांबकरने 3 गोल वर्षा परीट ,मनस्वी चतुर प्रत्येकी 1 गोल केला, उपांत्य फेरीत संत मीराशाळेने राजस्थानचा 6-3 असा पराभव केला, विजयी संघाच्या ऐश्वर्या पत्तार,मेघा कलखांबकर यांनी प्रत्येकी 2 गोल, तर वर्षा परीट मनस्वी चतुर यांनी प्रत्येकी 1 गोल केला .अंतिम लढतीत संत मीरा शाळेने तमिळनाडू दक्षिणक्षेत्र संघाचा 6-2 असा पराभव करित या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या ऐश्वर्या पत्तारने 3 गोल तर मेघा कलखांबकर मनस्वी चतुर वर्षा परीट यांनी प्रत्येकी 1 गोल केले.या विजेत्या संघात ऐश्वर्या पत्तार,वर्षा परीट,सुहाणी गुडेकर,मेघा कलखांबकर, हिंदवी शिंदे,प्रणाली मोदगेकर, स्वाती फडनाडी, ऋतिका हलगेकर,भावना बेर्डे,मनस्वी चतुर,सान्वी कुलकर्णी, माध्यमिक मुलींच्या गटात उपांत्य सामन्यात राजस्थानने संतमीरा दक्षिण मध्येक्षेत्राचा 11-8 असा पराभव केला पराभूत संघाच्या समीक्षा बुद्रुकने 8 गोल केले.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत संत मीराने तामिळनाडूचा 6-4 असा पराभव केला व कांस्यपदक पटकाविले विजयी संघाच्या समीक्षा बुद्रुकने 6 गोल केले.या संघात भावना कौजलगी,आदिती पाटील, अमृता करेगार,रितुषा जवरूचे, चैत्रादास,वृत्तिका बांदेकर, दिशा जोशी,सृष्टी तडकोड,समीक्षा बुद्रुक, प्रणिता मजुकर ,साक्षी पाटील, स्नेहा धनवडे यांचा संघात समावेश असून या संघाला प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील मयुरी पिंगट यांचे मार्गदर्शन लाभत आहे,या संघाला शाळेचा माजी विद्यार्थी ओमकार देसाई, ऐकरा नाईक, डॉ, हरिष पाटील,निधी कदम यांनी संघाला क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार ,विद्याभारती जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, संतमीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, ऋतुजा जाधव, इतर शिक्षक वर्गानी संघाचे अभिनंदन केले.
प्राथमिक मुलींचा संघ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली येथे होणाऱ्या 67 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now