This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भाजपतर्फे बैलजोडीने दुचाकी ओढून अनोख्या पद्धतीने आंदोलन*

*भाजपतर्फे बैलजोडीने दुचाकी ओढून अनोख्या पद्धतीने आंदोलन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक सरकारने केलेली पेट्रोल आणि डिझेल दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी भाजपतर्फे बैलजोडीने दुचाकी ओढून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात आले.
कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रू वाढ केली आहे.याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.इंधन दरवाढीमुळे बस तिकीट दरात वाढ होणार आहे.इंधन दरवाढ अन्यायी आहे अशी टीका भाजपने केली आहे.

दरवाढ त्वरित मागे घ्यावी म्हणून भाजपने बेळगावातील वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात आंदोलन छेडले. बैलजोडीला दोरीने दुचाकी बांधून ओढून भाजपने आंदोलन छेडले.यावेळी कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि सिद्धरामय्या यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.काँग्रेस सरकार राज्यातील जनतेला इंधन दरवाढ करून त्रास देत आहे.

काँग्रेस सरकार गॅरंटी योजना राबवण्यासाठी जनतेवर इंधन दरवाढीचा बोजा घातला आहे ही अन्यायी इंधन दरवाढ कर्नाटक सरकारने त्वरित मागे घ्यावी अशी मागणी भाजपने केली.भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24