बेळगांव:दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर महाविद्यालयात शनिवार दि. 13 जानेवारी 2024 रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम् एन् पाटील यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमुली करिता 100, 200, 400, 800, 1500, 5000 मीटर धावण्यांची स्पर्धा, लांबउडी, उंचउडी, भालाफेक, गोळाफेक या स्पर्धेत भाग घेतला .
स्पर्धांतून पारितोषीक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य एम. पाटिल प्रा. अनिता पाटील , प्रा अनीता पाटील, प्रा. व्ही. नाथ पाटील , जिमखाना असोशियेशन चे चेअरमन प्रा. सुरज पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धांना महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.