इंडिगो एअरलाइन्ससाठी नियुक्त विद्यार्थ्यांचा सत्कार
एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि रिटेल क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अॅपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमी बेळगाव हे त्यांच्या प्लेसमेंट आणि दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. सदर अकॅडमीचे २ विद्यार्थी इंडिगो एअरलाईनसाठी केबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफ साठी निवड झाली असल्याने या दोघाच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला .याप्रसंगी प्रमुख पाहुण्या ज्योती कत्ती (बॉलिवूड मिसेस इंडिया), विनोद बामणे (बिझनेस पार्टनर अॅपटेक बेळगाव),ज्योती बामणे (एम. डी श्री सरस्वती इन्फोटेक) आणि प्रकाश पाटील (शाखा व्यवस्थापक अपटेक बेळगाव) उपस्थित होते.
यावेळी अॅपटेक बेळगावने च्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे यश आणि स्वप्ने पूर्ण करण्यात अपटेक ने मदत केली आहे असे प्रतिपादन केले.तसेच मिसेस इंडिया ज्योती कत्ती यांनी विद्यार्थंना मोलाचे मार्गदर्शन केले.