विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
नदीतील पंपसेट काढायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना दूधगंगा नदी किनारी घडली आहे. अण्णाप्पा नायडू खोत वय 42 असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना चिकोडी तालुक्यातील मालीकवाड गावात जवळील दूधगंगा नदी किनारी घडली आहे.
अण्णाप्पा हे दूधगंगा नदीतुन मोटार पंपसेट काढण्याच्या प्रयत्नात असताना विजेच्या तारेला धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय हळहळ व्यक्त करत आहेत