बैलहोंगल शहरातील सोमवार पेठे येथील निवृत्त मुख्याध्यापक शिवाप्पा दोड्डाबसप्पा नंजन्नावर वय (90) यांचे निधन झाले. यावेळी बैलहोंगल येथे यांच्या शेवटच्या इच्छेनुसार डॉ. रामण्णा यांच्या चॅरिटेबल ट्रस्टीला मृतदेह दान करण्यात आला.
रामण्णा यांच्या चारी टेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉहुबळी येथील केएलई विद्यापीठाचे जगद्गुरू गंगाधर महास्वामीजी यांनी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी आपले शरीर दान केले.
ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी कुटुंबीयांचे आभार मानले
मृताच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.तसेच (शरीर दान, नेत्रदान, त्वचा दान आणि अवयवदान यासंबंधी अधिक माहितीसाठी डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याशी ९२४२४९६४९७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे