मध्यरात्री साडेतीन नंतर बेळगावातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या वादात तीन तरुणांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली.वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन डी जे च्या तालावर नाचत असलेल्या तरणांच्या मध्ये किरकोळ भांडण झाले.त्यानंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि एका तरुणाने चाकू काढून तीन तरुणांवर चाकूने हल्ला केला.
हल्ल्यात तीन तरुणांच्यावर पोटात आणि छातीवर वार झाले आहेत.चाकू हल्ला झाल्यावर हल्लेखोर तरुण पसार झाले.जखमी तरुणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडल्यावर चौकातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. ए पी एम सी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.पोलिसांनी हल्लेखोरांची माहिती गोळा करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.