बेळगाव जवळील टेप तयार करणाऱ्या कंपनीला
आग लागून आगीत एक जण मृत झाल्याची माहिती समजली आहे.या आगीत अनेक जण जखमी झाले आहेत.आग लागताच कंपनीत असलेले कामगार आरडाओरडा करत बाहेर पडले.आगीत काही कामगार भाजले असून त्यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालय आणि अन्य खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला आहे.
नावगे येथे स्नेहम टेप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला आग लागली असून शॉर्टसर्किटमुळे कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला आहे.आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून त्यांनी आग विझवण्यासाठी प्रारंभ केला आहे.त्यांना स्थानिक लोक देखील मदत करत आहेत.पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.