बेळगाव: शनिवारी रात्री अलतगा येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात एच.ई.आर.एफ टीमला यश आले आहे. एच.ई.आर.एफ टीमने काल रात्री शोधण्याचा प्रयत्न केला पण अंधारामध्ये त्यांना मृतदेह शोधण्यास अपयश ठरले. त्यानंतर आज सकाळपासूनच त्यांनी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यानंतर रविवारी दुपारी एकच्या दरम्यान नाल्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आला.
तसेच मृत युवकाचे नाव ओमकार पाटील असे आहे. तो वायरिंग काम करत होता. श्रावण मासानिमित्त ओमकार व त्याचा चुलत भाऊ ज्योतिनाथ हे दोघे कटिंग करून घेण्यासाठी कंग्राळी खुर्द गावाकडे चालले होते.त्यावेळी त्यांची दुचाकी नाल्यात कोसळली त्यामध्ये ज्योतिनाथ हा पाण्यातून बाहेर आला पण ओमकार पाटील हा नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला.
काल त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण अंधारामुळे ते साध्य झाले नाही.
सकाळपासूनच घटनास्थळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री स्व सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी शोध कार्य पाहत होते. तसेच बेळगाव पोलीस उपआयुक्त पी व्ही स्नेहा मॅडम या शोध मोहिमेची माहिती घेतली. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.दुपारी मृतदेह आढळल्यानंतर बेळगाव पोलीस आयुक्त मार्टिन यांनी मार्कंडेय नदी परिसराला भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.