बेळगाव : शहापूर येथे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे. कल्पना शंकर पाटील (वय ५१, रा. बसवण गल्ली, शहापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कल्पना यांना दम्याचा त्रास होता.
यामुळे त्यांची मानसिक स्थिती खालावली होती. यातूनच त्यांनी बुधवारी मध्यरात्री ते सकाळी नऊच्या सुमारास आळवण गल्लीतील मराठी शाळेच्या समोर असलेल्या लोखंडी अँगलला नेसलेल्या साडीने गळफास घेतला. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर ही माहिती शहापूर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत महिलेचा नातेवाईक विनायक महादेव पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांत नोंद झाली आहे. निरीक्षक एस. एस. सीमानी तपास करीत आहेत.