त्या खुनाची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू असल्याची माहिती
बेळगाव:कर्ले येथील खुनाचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. परंतु, याचे गुढ अद्यापही कायम असून काहीही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन गिड्डू तळवार (वय ५०, रा. कर्ले, ता. बेळगाव) हे सोमवारी कर्ले- बहाद्दरवाडी रोडवरून दुचाकीवरून जाताना बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांचा निघृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. हा संपूर्ण रस्ता सुनसान असून आजूबाजूला वाडीवस्तीही नाही. त्यामुळे खुन्यांनी कर्ले गावापासून ३०० मीटरवरील हे स्थळ निवडले होते. मोहन गावाकडे जाताना बुरखाधारी अज्ञात मारेकऱ्यांनी
<span;>त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. दुचाकीवरून आलेले हे दोघे बुरखाधारी इसम होते, इतकीच माहिती पोलिसांना मिळाली आहे. हा परिसर सुनसान असल्याने खुनी सहजरित्या
<span;>पसार झाले आहेत. विशेष म्हणजे हा रस्ता झाडीचा असल्याने येथे सीसीटीव्हीची मदतही पोलिसांना मिळालेली नाही. त्यामुळे खुन्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
आयुक्तांकडून पाठपुरावा याबाबत पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला
असता खुन्यांच्या शोधासाठी दोन पथके बनवली आहेत. ही पथके स्थानिक तालुक्यासह अन्य काही ठिकाणी शोध घेत आहेत. अद्याप काहीही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. आयुक्तालयातील विशेष पथक देखील यासाठी नियुक्त केले आहे. परंतु, काहीही सुगावा लागला नसल्याचे त्यांनी सांगितले.