बेळगांव: मेन रोड शास्त्रीनगर कंग्राळी बुद्रुक येथे भाडोत्री घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक २७/८/२०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता उघडकीस आली आहे. मूळचा कलमेश्वर नगर येथील रहिवासी संजय होंगल वय वर्ष ४१ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा आहे.
मिळालेली माहिती अशी की पत्नी आठ दिवसांकरिता माहेरी सांबरा गावी गेली होती.आठ दिवसानंतर घरी परतल्यानंतर तिने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.दरवाजा आतून बंद होता संजयने दरवाजा उघडलाच नाही त्यानंतर खिडकीतून बघितले असता संजय पोंगल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली.
घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.