बेळगावातील मारुती नगर येथील महावीर कॉलनीमध्ये घरात सिलेंडर ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे घरी कोणी नसताना सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर खाक झाले आहे.शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या व शेडमध्ये राहणाऱ्या चन्नाप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरात रात्री उशिरा सिलिंडरचा स्फोट झाला .
त्यामुळे संपूर्ण घर पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र विठ्ठल लमाणी यांनी जमा केलेले 1.80 हजार रोख व 35 ग्रॅम सोने जळून खाक झाले आहेत .घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. तसेच माळ मारुती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन तपासणी केली.