बेळगाव येथील एअरमेन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २६२४ अग्निविरवायू प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ पार पडला.एअर व्हॉईस मार्शल आर.रविशंकर दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी एअर व्हॉईस मार्शल आर.रविशंकर यांनी प्रशिक्षणार्थीं कडून मानवंदना स्वीकारली.त्यानंतर त्यांनी संचलनाचे निरीक्षण केले.बावीस आठवड्याच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या प्रशिक्षणार्थींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निविरवायूना आता देशातील विविध भागात नियुक्त केले जाणार आहे.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या बँडने सुरेल रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी प्रशिक्षणार्थींनी शारीरिक कसरती सादर करून आपल्या शारीरिक तंदुरुस्तीचे दर्शन घडवले.दीक्षांत समारंभाला अग्निविरवायू प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.