*येळ्ळूरच्या राजेश्वर चा मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात पार*
सार्वजनिक श्री बालगणेश उत्सव मंडळ नेताजी गल्ली येळ्ळूर या मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 26/08/2024 रोजी सायंकाळी 8.00 वा. यावर्षीच्या गणेश मुर्तीची बिदाया दिलेले श्री यल्लाप्पा फकिरा घाडी यांना पुजेचा मान मंडळाने दिला यावेळी सर्व गल्लीतील नागरिकांनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
यावर्षीच्या उत्सवात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून नेताजी गल्लीच्या राजेश्वराचे आगमन मोठ्या संख्येने गल्लीतील महिला व पुरुष तसेच कार्यकर्ते उपस्थित राहून आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करण्याचे ठरविले आहे तसेच महाप्रसाद व विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे .