This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कन्नड रक्षण वेदिकेच्या म्होरक्याने केली हास्यास्पद मागणी*

*कन्नड रक्षण वेदिकेच्या  म्होरक्याने केली हास्यास्पद मागणी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घाला अशी हास्यास्पद मागणी कन्नड रक्षण समितीच्या म्होरक्याने जिल्हाधिकारी कार्यालयात कर्नाटक सीमा आणि नदी आयोगाच्या अध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीत केली.कर्नाटक सीमा आणि नदी आयोगाचे अध्यक्ष ,सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.बैठकीत कन्नड संघटनांच्या नेत्यांनी केवळ मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर आगपाखड केली.

व्यापारी आस्थापनावर चौदा मार्च पूर्वी सगळे फलक साठ टक्के कन्नडमध्ये बसवले पाहिजेत.बेळगाव हा सीमाभाग असल्याने याची अमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी करून समिती आणि शिवसेनेवर दीपक गुडगेनट्टी याने तोंडसुख घेतले.महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना नेते दोन राज्यात तेढ निर्माण करत आहेत.यामुळे बेळगावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितिवर बंदी घाला आणि त्यांच्या नेत्यावर गुंडा कायदा लावून तडीपार करा अशी मागणीही नेहमी मराठी भाषिक आणि समितीचा द्वेष करणाऱ्या या तथाकथित कन्नड संघटनेच्या म्होरक्याने केली.मराठी भाषिकांची बाजू उचलून अन्यायाच्या विरोधात लिखाण करणाऱ्या वृत्तपत्राना दिल्या जाणाऱ्या सवलती काढून घ्या अशी गरळ देखील बैठकीत ओकली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24