This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बसची संख्या वाढीव करा :यांनी केली मागणी*

*बसची संख्या वाढीव करा :यांनी केली मागणी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन संघटनेतर्फे बसची संख्या वाढवावी आणि विद्यार्थी,नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलन करून करण्यात आली.बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने महिलांसाठी कर्नाटकात शक्ती योजने अंतर्गत मोफत प्रवास योजना अमलात आणली आहे.ही योजना अमलात आणल्या बद्दल कर्नाटक सरकारचे आम्ही अभिनंदन करतो असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पण सध्या बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थी तसेच कामावर जाणारे नोकरदार यांना बसची वाट बघत तासनतास थांबावे लागत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर कामावर उशिरा गेल्यामुळे नोकरदार व्यक्तींना आर्थिक फटका बसत आहे ज्येष्ठ नागरिकांना देखील असाच त्रास होत आहे.

त्यामुळे बसची संख्या वाढवून विद्यार्थी,नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांची समस्या दूर करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24