भगतसिंग ग्रुप निलजी येथील श्रीराम सेना हिंदुस्तान आयोजित एका माणसाने बैलगाडी ओढण्याची शर्यत शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेकरिता प्रवेश फी 700 रुपये असून पहिले क्रमांक आठ हजार एक रुपये देण्यात येणार आहे.
तसेच दुसरे क्रमांक 6501 तृतीय क्रमांक 5501चौथे क्रमांक 4501 देण्यात येणार असून या प्रकाराचे दहावे बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे.
तसेच या स्पर्धेमध्ये निलजी गाव मर्यादित स्पर्धा सुद्धा पार पडणार आहे. या स्पर्धेकरिता प्रवेश फी दीडशे रुपये असून प्रथम क्रमांक 3001 रुपये द्वितीय क्रमांक 2001 रुपये तृतीय क्रमांक 1001 चतुर्थ क्रमांक 501 आणि पाचवे बक्षीस 101 रुपये आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेकरिता 30 सेकंदाचा अवधी देण्यात आला आहे.
ही स्पर्धा 16 डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते दहा पर्यंत छत्रपती संभाजी महाराज चौक निलजी येथे पार पडणार आहे. तसेच या स्पर्धे करिता नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.