This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*पोलिसांना दारू मटण पार्टी पडली महागात*

*पोलिसांना दारू मटण पार्टी पडली महागात*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हायवे पेट्रोलिंग ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांनी रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून दारू,मटण पार्टी केल्याने जिल्हा पोलिस प्रमुखानी दोन पोलिसांना निलंबित केले.

हायवे पेट्रोलिंग ड्युटी बजावत असताना नागराळ गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला सरकारी वाहन क्रमांक के ए 22 जी 1818 थांबवून पोलीस शिपाई विलास धुमाळे आणि संतोष कमते हे दारू,मटण पार्टी करत असल्याची घटना उघडकीस आली.आपत्कालीन प्रसंगी,भांडण,अपघात अशा प्रसंगी जनतेच्या मदतीसाठी म्हणून 112 क्रमांकाची पोलीस खात्याने आपत्कालीन सेवा सुरू केली आहे.

या वाहनावर ड्युटी असलेले पोलीसच दारू पिऊन पार्टी करत असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.हे दोन्ही पोलीस चिकोडी पोलीस स्थानकाचे असून त्यांना जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी निलंबित केले आहे.दारू पिलेले पोलीस आपत्कालीन प्रसंगी जनतेच्या मदतीला कसे जाणार अशी चर्चा जनतेत होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24