शहरामध्ये काल एक चार लाखांची चोरी उघडकीस आली या चोरीमध्ये काही महिलांच्या टोक्याने आणि त्यांच्यासोबत आलेल्या पुरुषांनी खडेबाजार येथील एका साडीच्या दुकानात चोरी केल्याचे उघडकीस आली आहे.
दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरटे व भामट्यांकडून शहरातील खडेबाजार येथील एका कापड दुकानांमध्ये दुपारच्या सुमारास पाच सहा महिला व त्यांच्यासोबत एक पुरुष खरेदीच्या बहाण्याने आत शिरले.
तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांचा लक्ष विचलित करून महागड्या रेशीम साड्या लंपास केल्या. कंपास केलेल्या साड्यांची किंमत जवळपास चार लाख रुपये असल्याचे समजते.
या प्रकरणी खडे बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज भरून चोरट्यांचा शोध घेत आहेत.