https://facebook.com/1236562643730626
*मिरचीचे आणि टोमॅटोचे भाव भिडले गगनाला*
पावसाळा असून देखील पावसाने दडी मारल्याने भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडाडले आहेत.बेळगावात हिरव्या मिरचीचे ने सेंच्युरी मारली आहे.होलसेल भाजी मार्केटमध्ये नऊशे रुपये दहा किलो असा हिरव्या मिरचीचा भाव झाला असून किरकोळ विक्री शंभर ते एकशे वीस रू किलो दराने केली जात आहे .
टोमॅटो देखील चांगलाच वधारला असून ऐंशी ते नव्वद रू किलो भावाने टोमॅटो ची किरकोळ विक्री केली जात आहे.सगळ्या भाज्या ऐंशी रुपये किलो दराने विकल्या जात आहेत.आणखी काही दिवस पाऊस लांबला तर सगळ्या भाज्या सेंच्युरी मारण्याची शक्यता भाजी विक्रेते वर्तवत आहेत.भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता कडधान्याला पसंती देत आहे.