वृद्धाश्रम मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
बेळगाव: जिल्हा केंद्रीय निवृत्त सशस्त्र पोलीस दल संघटनेच्या वतीने बसवंत कुडची देवराज अरस कॉलनी येथील वृद्धाश्रमात 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
प्रथमता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यानंतर आश्रमातील नागरिकांना अल्प उपहार व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी याप्रसंगी निवृत्त डी.आय.जी अरुण पाटील निवृत्त कमांडंट अमृत सोलापूरकर,कुमार हिरेमठ, एन.बी.चलवटकर, मोहम्मद हनीफ, बसवराज बेळगावी, वीरुपक्षी कोलकार, प्रमोद पाटील यासह निवृत्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते.