<span;>बेळगाव प्रतिनिधी कॉलेजमधील युवतींचे फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टोळक्याला धारवाड पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळक्यातील विद्यार्थी हे बेळगावचे रहिवासी असून स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी धारवाड येथे वास्तव्य करून असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
<span;>सरकारी नोकरी मिळवण्याकरिता स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ही मुले आपल्या पालकांपासून दूर धारवाड शहरात राहत होती. धारवाड मधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील मुलींचे फोटो मिळवून ते अश्लील पद्धतीने एडिट करायचे आणि सोशल मीडियाच्या ट्रोल पेजवर पोस्ट करायचे. त्यानंतर ते फोटो हटविण्यासाठी मोठ्या रकमांची मागणी करणे हा धंदा त्यांनी सुरू केला होता.
<span;> पोस्ट केलेले व्हिडिओ हटवण्यासाठी 15 हजार. पैशाची मागणी केली . पैसे न दिल्यास आणखी फोटो अश्लील एडिट केले जातील अशी धमकी देखील देण्याचा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांना माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सचिन खडकभावी, अक्षय कांबळे आणि आकाश मेटी या तीन आरोपींना अटक केली आहे.
<span;> तरुण-तरुणींचे फोटो अश्लील एडिट केल्याच्या आरोपावरून धारवाड उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी बेळगावातील तीन तरुणांना अटक केली.
<span;> विशेष म्हणजे या आरोपींपैकी एकाच्या वडिलांचाही या प्रकरणात सहभाग असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सचिन खडकभावीच्या वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तक्रार न दिल्याने जीवाला धोका देणाऱ्या सचिनच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.