This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*हिंडलगा कारागृहावर बेळगाव पोलिसांनी मारले धाड*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्यामुळे तसेच अन्य कारणांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या हिंडलगा जेलवर बेळगाव पोलिसांनी धाड टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली दीडशे हून अधिक अधिकारी आणि पोलिसांनी हिंडलगा जेलवर धाड टाकली.पाच पोलीस सहाय्यक आयुक्त देखील धाडीत सहभागी झाले होते.

पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी देखील धाडसत्र सुरू असताना जेलला भेट दिली.अचानक पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे जेलमधील कर्मचारी आणि कैद्यांना शॉक बसला.जेलमधील कैदी जयेश पुजारी याने मंत्री नितीन गडकरी यांना जेलमधून फोन करून धमकी देऊन दहा कोटीची मागणी केल्यामुळे काही महिन्यांपूर्वी हिंडलगा जेल चर्चेत आले होते.जेलमध्ये कैद्यांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा आहार, कैद्यामधील हाणामारी,कैद्यांच्या कडे असलेले मोबाईल तसेच चैनीच्या वस्तू,मद्य, सिगारेट यापूर्वी सापडल्या मुळे कडेकोट बंदोबस्त असताना देखील जेलमध्ये या वस्तू पोचतात कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रविवारी पोलिसांना धाडीमध्ये मोबाईल चार्जर,ब्ल्यू टूथ डिव्हाईस, सिगारेट आदी वस्तू सापडल्या आहेत.या वस्तू कैद्यांना जेलमध्ये कोण देते याचा तपास पोलिसांनी हाती घेतला आहे.पोलिसांनी टाकलेल्या धाडीच्या वेळी श्वान पथक,बॉम्ब शोधक पथक देखील सहभागी झाले होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now