श्री विश्वकर्मा मनु मय संघ अनगोळ तर्फे श्री विश्वकर्मा जयंती मोठया उत्साहने पार पडली .यावेळी सकाळी ठीक 9 वाजता पद्मा हार्डवेअर चे संचालक श्री जितेंद्र गुंडपाणनावर व माजी नगरसेवक अनिल नागेश मुचंडीकर मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच इतर पदाधीकारी तसेच कार्यकर्ते यांच्या हस्ते झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला .
त्यानंतर 9.30 वाजता मूर्तीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली आणि दुपारी महाप्रदाचे वितरण करण्यात आले .यावेळी उद्योगव्यासायिक वनिता सुतार व सरिता सुतार कांचना लोहार यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला.
त्यानंतर सायंकाळी 6 वाजता महिलांचा हळदी कुंकू संभारंभ पार पडला.तसेच सायंकाळी 6वाजता री गुरुदत्त सेवा महिला भजनी मंडळ ,9 वाजता श्री राम भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहकार्य केले.
यावेळी सागर नारायण लोहार परशराम अण्णाप्पा लोहार अनिल नागेश मुचंडीकर चंद्रकांत लोहार, अरुण देसूरकर, किरण हिरामणी लोहार,संदीप मंडोळकर, पिराजी लोहार, पिटू ठोकणेकर,सचिन बापू सुतार, आदित्य सुरूटेकर, रमेश मुचंडीकर,अभिषेक सुतार, राहुल सुतार,दिनेश तेरणी, पवन लोहार नामदेव सुतार, सुरेश सुतार, महादेव लोहार, विनायक लोहार, नवरत्न लोहार, दशरथ रामचंद्र लोहार,सुरेश लोहार,उपस्थित होते.