This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेळगाव शहर सज्ज*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ओल्ड मॅनचे दहन करून नववर्षाचे स्वागत करण्याची बेळगावात परंपरा असून विविध आकाराचे आणि विविध प्रकारचे ओल्ड मॅन तयार करण्यात आले आहेत.

बेळगावच्या कॅम्प भागात अनेक वर्षापासून ३१ डिसेंबरच्या रात्री बारा वाजता ओल्ड मॅनचे दहन करून नववर्षाचे स्वागत केले जाते.केवळ कॅम्प भागापुरती मर्यादित असलेली ही परंपरा आता शहर आणि परिसरात पसरली आहे.चर्चेत असलेले इंग्रजी चित्रपटातील चित्रविचित्र पात्रांची निवड करून ओल्ड मॅनची निर्मिती केली जाते.अगदी पाच फुटपासून तीस फूट उंचीचे ओल्ड मॅन तयार केले जातात. कॅम्प भागात तर तरुण मंडळांची अधिक उंचीचे आणि वेगळ्या प्रकारचे ओल्ड मॅन तयार करण्याची स्पर्धाच लागलेली असते. पुठ्ठा,रंगीबेरंगी कागद,बांबू, गवत यांचा वापर करून ओल्ड मॅन तयार करण्यात येतात.काही मंडळांचे कार्यकर्ते एक महिन्यापासून तयारीला लागलेले असतात.

ओल्ड मॅन तयार करण्याच्या कामात काही कुटुंबे महिनाभर गुंतलेली असतात.त्यांच्याकडे पाच फुटपासुन ग्राहक सांगेल त्या प्रमाणे ओल्ड मॅन तयार करून दिला जातो.ओल्ड मॅनला रंगीत कागदाचा कोट चढवला जातो.डोक्यावर हॅट घातली जाते.ओल्ड मॅनच्या आत फटाके देखील घालण्यात येतात.ओल्ड मॅन पेटल्यावर जमलेले लोक एकच जल्लोष करतात.पाचशे रुपयांच्या पासून पंधरा हजार रुपये पर्यंत ओल्ड मॅनच्या किमती आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now