सन्मित्र सोसायटीच्यावतीने आज चित्रकला स्पर्धा
बेळगाव: येळ्ळुर येथील सन्मित्र मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने रविवार 15 सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री चांगळेश्वरी मंदिर येथे सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये होणार आहे. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा गटांमध्ये स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेसाठी स्पर्धकाला आयोजकांतर्फे कागद पुरवण्यात येईल मात्र इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रुपये 501, द्वितीय क्रमांक 301 आणि तृतीय क्रमांकासाठी रुपये 201 असे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन सन्मित्र सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.