बेळगाव:जिल्हा क्रीडा कराटे संघटनेतर्फे 10 व्या अधिकृत जिल्हा कराटे निवड स्पर्धा संपन्न झाल्या.14 वर्षाच्या खालील मुलं व मुलींची कराटे निवड
दिनांक 25 ऑगस्ट 2024 शानबाग हॉल कॅम्प इथे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्यातील 250 विद्यार्थीनी सहभाग घेतले होता.
या स्पर्धा बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेतर्फे आयोजित केले होते. स्पर्धाचे उद्देश 14 वर्षाच्या खालील मुलांचे व मुलींची राज्य कराटे स्पर्धेसाठी पहिले क्रमांक, सुवर्णपदक विजेत्यांच्या विद्यार्थ्यांची निवडणूक करण्यात आली.
स्पर्धेला पंचगिरी म्हणून विठ्ठल रोजगार ,प्रभाकर केलेकर,अक्षय परमोजे, हरी सोनार,निलेश गोरखा यांनी काम पाहिले.तसेच मुख्य अतिथी म्हणून गजेंद्र काकतीकर,रमेश अलवडेकर व जितेंद्र काकतीकर यांच्या हस्ते कराटे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये निवड झालेले कराटे पट्टू दिनांक 14,15 सप्टेंबर 2024 रोजी येथे बेंगलोर इंडस्ट्रियल मध्ये होणारे राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी भाग घेणार असून येथे त्यांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
या कराटे स्पर्धेमध्ये एकूण 45 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रमेश अलगोडेकर ,गजेंद्र काकतीकर व जितेंद्र काकतीकर यांच्या बहुमोल मार्गदर्शन लाभले.