बेळगाव, प्रतिनिधी:महात्मा गांधी पदवी पूर्व कॉलेज बेळगाव आणि पदवी पूर्व कॉलेज हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पदवीपूर्व कराटे स्पर्धांचे उद्घाटन शनिवारी महात्मा गांधी भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुले आणि मुलींनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या स्पर्धा आयोजन करण्यासाठी बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. कराटे स्पर्धा महात्मा गांधी भवन येथे तर बास्केटबॉल आणि सिमलम स्पर्धा नेहरू स्टेडियम येथे घेण्यात आल्या. कराटे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगावचे डेप्युटी डायरेक्टर महादेव कांबळे, महात्मा गांधी पदीपूर्व कॉलेजचे मुख्याध्यापक संजय घोडावत मेडिकल आयआयटीचे इन्चार्ज रेड्डी सर, फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर जी एन पाटील, प्रभू शिवा नायकर, कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर, डॉक्टर अमित जडे, परशुराम काकतीकर, विठ्ठल रोजगार, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर, प्रभाकर किल्लेकर आधी उपस्थित होते.