Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*उज्वल नगरमध्ये रस्ता आणि गटार विकासकामांना सुरुवात*

बेळगाव : डी मीडिया
बेळगाव उत्तर मतदारसंघातील उज्वल नगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. आमदार राजू आसिफ शेठ आणि युवा नेते अमान शेठ यांच्या पुढाकारातून उज्वल नगर येथील 14 व्या क्रॉस परिसरातील अल सहारा कॉलनी रस्ता व गटार कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या परिसरातील रस्त्यांची अवस्था आणि गटार व्यवस्थेअभावी नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयी लक्षात घेऊन ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

भूमिपूजनानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. परिसरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी रस्ता आणि गटार व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार राजू आसिफ शेठ यांनी उज्वल नगरमधील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, तसेच परिसरातील प्रलंबित कामे लवकर मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी विकासकामांना सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावातील मराठी फलक हटवण्याच्या घटनांवर केंद्राची दखल**बेळगावजवळ इंडाल्को कंपनीत कामगाराने घेतला गळफास; पोलिसांकडून तपास सुरू**जलसंवर्धन आणि माती संवर्धनासाठी ‘एलआरआय यात्रा, खेत बचाव’ अभियान सुरू**उज्वल नगरमध्ये रस्ता आणि गटार विकासकामांना सुरुवात**ओल्ड गांधी नगरमध्ये UGD, गटार आणि रस्ता विकासकामांना प्रारंभ**मार्केट पोलिसांची अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई; दोन प्रकरणांत गुन्हे दाखल**बेळगावसह विविध ठिकाणी ईडीची छापेमारी; वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित ठिकाणांची तपासणी**बेळगाव भाजप कार्यालयात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली**'मराठी भाषा प्रेरणा मंच 'तर्फे मराठी विद्यानिकेतनला महात्मा जोतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित**महाराष्ट्रातही पाण्याची कमतरता, त्यामुळे पाणी सोडणे शक्य नाही : मंत्री सतीश जारकीहोळी*