बेळगाव : डी मीडिया
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त बेळगाव भाजप महानगर कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजप बेळगाव महानगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा गीता सुतार, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महांतेश वक्कुंद, ज्येष्ठ नेते मारुती झिरळी, माजी आमदार अनिल बेनके, उपमहापौर हनमंत कोंगाली यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रसेवेतील योगदानाचे स्मरण करण्यात आले आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
