LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*बेळगावजवळ इंडाल्को कंपनीत कामगाराने घेतला गळफास; पोलिसांकडून तपास सुरू*

बेळगाव : डी मीडिया
बेळगाव शहरालगत असलेल्या इंडाल्को कंपनी परिसरात एका कामगाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत कामगाराची ओळख शंकर तळवार (रा. मुत्यानट्टी गाव) अशी झाली आहे. संबंधित कामगार मागील काही वर्षांपासून कंपनीत कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शंकर तळवार यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवर संदेश लिहिल्याचे समोर आले आहे. या संदेशामध्ये त्यांनी नोकरीतील अडचणी आणि काही आरोपांचा उल्लेख केल्याची माहिती आहे. या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केएसआरपीच्या तुकड्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*