LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावातील मराठी फलक हटवण्याच्या घटनांवर केंद्राची दखल*

बेळगाव : डी मीडिया
बेळगाव शहरातील मराठी फलकांबाबत निर्माण झालेल्या वादाची केंद्र सरकारच्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाने दखल घेतली आहे. मराठी व्यावसायिकांच्या आस्थापनांवरील फलक हटवण्याच्या घटनांबाबत कर्नाटक सरकारच्या गृह विभागाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनगोळ परिसरातील एका हॉटेलसह शहरातील काही मराठी व्यावसायिकांच्या आस्थापनांवरील फलकांना लक्ष्य करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.

या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री आणि अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाकडे निवेदन सादर केले होते. निवेदनासोबत संबंधित घटनांची माहिती आणि कागदपत्रे जोडण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाकडून कर्नाटक सरकारच्या गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच बेळगाव जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवण्यात आले आहे.

भाषिक अल्पसंख्याकांना संविधानाने दिलेले अधिकार आणि संरक्षण लक्षात घेऊन या प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पत्रातून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बेळगाव सीमाभागातील भाषिक प्रश्नावर प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घ्यावी आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून करण्यात आली आहे.

चौकट
"मराठी भाषिकांना संविधानिक अधिकार मिळाले पाहिजेत"
सीमाभागातील मराठी भाषिकांना संविधानाने दिलेले भाषिक अधिकार आणि संरक्षण मिळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशांची गांभीर्याने दखल घेऊन मराठी व्यावसायिकांना लक्ष्य करणाऱ्या प्रकारांवर प्रशासनाने योग्य कारवाई करावी.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी