LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Entertainment News

*मराठी विभागाच्यावतीने सोमवारी ‘दशावतार’*

बेळगाव ः राणी चन्नमा विद्यापीठ, मराठी विभाग आणि श्री बोर्डेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ (दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग) प्रस्तुत ‘दशावतार’ हे नाटक आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी २५ मे सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत कोनवाळ गल्लीतील रिझ थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 
बेळगाव ही संगीत कला आणि लोकसंस्कृतीची समृद्ध परंपरा असलेले सांस्कृतिक शहर आहे. बेळगाव येथे आजपर्यंत अनेक मराठी नाटके झाली असून बेळगावकरांच्या सहभागाने ते यशस्वीही झाली. ‘दशावतार’ परंपरा लोककलेची हे नाटक वेगळ्या धाटणीचे आहे. बेळगावात मराठी विभागाच्यावतीने पुन्हा एक नाटक होत आहे. यामध्ये दिलिप सामंत, विनोद परब, विजय वाडकर, संजय मोर्ये, अंकुश गरुड, सुधीर परब, प्रसाद मेस्त्री, संजय पराडकर, नारायण मालवणकर, दिपक नार्वेकर यांची भूमिका आहे. हार्मोनियम रामचंद्र परब, पखवाज गणेश मेस्त्री, तालरक्षक सचिव पालक हे संगीतसाथ करणार आहेत. तिकीट हवी असल्यास अशोक आलगोंडी ९०३५३८५९२३, सतीश जाधव ९६६३३२५६१४, महादेव खोत ९६०६८८०३४९, संतोष मादकाचे ८०९५३८१०९७ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.  
----------------

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा आजपासून*3 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन*बेळगावात भाजपची ‘सेवा ज्योती यात्रा’; पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेला उजाळा**बेळगाव उत्तर मतदारसंघात 24x7 पाणीपुरवठा योजनेला गती; आमदार राजू सेठ यांच्याकडून कामाची पाहणी**मध्यवर्ती सार्वजनिक दसरा महोत्सव महामंडळाच्या उपाध्यक्षपदी संदीप कामुले यांची निवड**निपाणीत रेशन तांदळाची अवैध वाहतूक उघड; दोन ट्रकसह 41.72 लाखांचा मुद्देमाल जप्त**बेळगाव ऊसदराचा प्रश्न : शेतकरी संघटनेची ₹६ हजार दराची मागणी**शिवांगी राहुल मोदगेकर यांना ‘बेला टिचर्स अवॉर्ड’ने सन्मानित**पुण्याच्या MPSC आंदोलनात घुमला सीमालढ्याचा जयघोष “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”च्या घोषणेने सीमावासीयांचे लक्ष वेधले**कुल्फी 'तर्फे घेण्यात आलेल्या 'लिहितं व्हा'स्पर्धेत सोमी पाटीलचे यश*