बेळगाव तारीख 21 सरस्वती विद्यामंदिर विद्यालय मुखर्जी नगर देवास मध्य प्रदेश येथे 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 37 व्या विद्याभारती राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा विद्याभारतीचे कराटे खेळाडू रवाना झाले आहेत.अनगोळ संत मीरा शाळेचा कराटे खेळाडू आदित्य सोनार देवेंद्र जीनगौडा शाळेचे खेळाडू पृथ्वी नुली व रतन पाटील हे खेळाडू प्रशिक्षक हरीश सोनार व कृष्णा जाधव यांच्या समवेत या स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत नुकत्याच बेंगलोर येथे झालेल्या क्रांती व क्षेत्रीय कराटे स्पर्धेत या खेळाडूनी उल्लेखनीय कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले होते.या खेळाडूंना विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर,विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, राज्य सहसचिव सुजाता दप्तरदार यांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभत आहे.

