Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी*

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आजपासून बेळगाव होणार शिवमय; शिवज्योतीच्या आगमनाने उत्साह शिगेला

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पासून संपूर्ण शहर शिवमय होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांवर आणि “जय जिजाऊ, जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

छत्रपती शिवाजी उद्यान येथे आज सकाळी ६ वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे विधीपूर्वक पूजनाचा कार्यक्रम पार पडला. अग्रभागी तेजोमय शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक भाजप नेते डॉ. रवी पाटील तसेच अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर सामूहिक आरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.

दरम्यान, विविध दुर्गांवरून आणण्यात आलेली पवित्र शिवज्योत शहरात दाखल झाली असून, मावळ्यांच्या आगमनाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

शिवजयंतीनिमित्त सादर होणारे चित्ररथ व सजीव देखावे यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून, हे देखावे भव्य-दिव्य स्वरूपात सादर होणार आहेत. मिरवणूक शांततेत व शिस्तीत पार पाडावी, असे आवाहन अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले.

सरचिटणीस जे. बी. शहापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी अंगीकारावा, असे प्रतिपादन केले आहे.
यावेळी उपस्थित शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव सरचिटणीस जे बी शहपूरकर,प्रसाद पाटील विनायक बावडेकर अरुण पाटील संजय नाईक मारुती पाटील,विजय कुंटे भूषण पाटील, राम कुलकर्णी उमेश शिदोलकर यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
माजी आमदार राजेश पाटील यांनी केला NEET टॉपर सार्थकचा गौरवसीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौराबेळगावात रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; प्रशासनावर सवाल*मोबाईलच्या कारणावरून मित्राचा जीव घेतला; मंदिरातच घडली थरारक हत्या**सोनम वांगचूक रुग्णालयात; पत्नी गीतांजलींची औषधांबाबत स्पष्ट भूमिका**SIR सर्वेक्षणातील अडचणींबाबत किरण जाधवांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे धाव**बेळगावातील हनुमान मंदिरात माकडाचा शांत वावर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल**संवेदनशीलता-जीवनानुभव यांच्या मिलाफातूनच खरी कविता जन्माला येते : कवी शिवाजी शिंदे**इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान**युनियन जिमखान्यावर लष्कराचा ताबा; न्यायालयीन निर्णयानंतर अंमलबजावणी*