Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावमध्ये परंपरेनुसार रविवार दि १९ एप्रिल रोजी शिवजयंती मंगळवारी २१ रोजी चित्ररथ मिरवणूक*

बेळगाव :

बेळगावमध्ये वैशाख शुद्ध द्वितीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते,तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते.
यावर्षीही रविवार दि.१९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी होणार असून मंगळवार दि २१ रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात जत्तीमठ येथे मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवार दि १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे मध्यवर्तीच्या वतीने करण्यात येणार आहे.

त्यानंतर सकाळी ठीक ९.०० वाजता नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन- आरती करण्यात येईल.
मध्यवर्तीच्या वतीने सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात येईल.

मंगळवार दि २१ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता नरगुंदकर भावे चौकात मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार असून त्यानंतर पालखी आणि चित्ररथ मिरवणूक मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, डॉ राजेंद्रप्रसाद चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, किर्लोस्कर रोड, जत्तीमठ मार्गे सम्राट अशोक चौक,रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, मुजावर गल्ली, पाटील गल्ली कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी १०७ वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

तरी या सर्व कार्यक्रमांना सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्यवाह मदन बामणे शिवराज पाटील आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
माजी आमदार राजेश पाटील यांनी केला NEET टॉपर सार्थकचा गौरवसीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौराबेळगावात रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; प्रशासनावर सवाल*मोबाईलच्या कारणावरून मित्राचा जीव घेतला; मंदिरातच घडली थरारक हत्या**सोनम वांगचूक रुग्णालयात; पत्नी गीतांजलींची औषधांबाबत स्पष्ट भूमिका**SIR सर्वेक्षणातील अडचणींबाबत किरण जाधवांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे धाव**बेळगावातील हनुमान मंदिरात माकडाचा शांत वावर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल**संवेदनशीलता-जीवनानुभव यांच्या मिलाफातूनच खरी कविता जन्माला येते : कवी शिवाजी शिंदे**इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान**युनियन जिमखान्यावर लष्कराचा ताबा; न्यायालयीन निर्णयानंतर अंमलबजावणी*