बेळगांव मधील प्रसिद्ध व नामवंत शाळा बिर्ला इंटरनॅशनल स्कूल व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . स्पर्धेच्या शेवट दिवशी दक्षिण विभागीय स्केटर्सनि 105 मेडल जिंकून प्रथम स्थान पटकावला, 55 मेडल जिंकत उत्तर विभागीय दुसऱ्या स्थानावर,31 मेडल जिंकत मध्य विभागीय तिसऱ्या स्थानावर तर इंटरनॅशनल विभागीय मध्ये 1मेडलवर वर समाधान मानावे लागले, या स्पर्धेचे बक्षीस समारंभ बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे अध्यक्ष उमेश कलघटगी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चे मुख्याध्यापक डॉ प्रेमानंद जाधव,आलोक त्रिपाठी सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर स्पर्धेतील स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
अबीर आहुजा 1 सुवर्ण, चिरा विनविक 1 रौप्य, रेयंश कुलकुमी 1 कांस्य, ईशा शर्मा 1 सुवर्ण, बी श्री साई महिता 1 रौप्य, यालिनी चिटीबाबू 1 कांस्य, धूर्वा अरविंद 1 सुवर्ण, अभिनव विमल 1 रौप्य, श्रेवंत भूपती 1 कांस्य,स्वरा साळुंखे 1 सुवर्ण, पृथ्वीका 1 रौप्य, ओविया 1 कांस्य, निरान राज एन 1 सुवर्ण आरव रावत 1रौप्य, क्षितिज सिंग 1 कांस्य, भव्या सिंग 1सुवर्ण, कशीश सिंग 1 रौप्य, निदरसना एस पी 1 कांस्य,लव्यांश खंडोडीया शाणू मन्नू 1 रौप्य, उत्कर्ष कणसारा 1कांस्य, दीपिता बी 1 सुवर्ण, त्रिशा 1रौप्य, अन्वी वर्मा 1 कांस्य,प्रिजेश 1 सुवर्ण, भावित बजाज 1रौप्य, त्रियांक शंकर 1 कांस्य, भव्या बजाज 1 सुवर्ण, मधुमीता वी 1 रौप्य, आरना भटनागर 1 कांस्य
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर, बिर्ला इंटरनॅशनल चे शिक्षक व स्टाफ आणि ईतर अनेक जण परिश्रम घेत आहेत

