Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क*

बेळगाव : शहरातील सरदार मैदानावर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दरम्यान एक अनोखा आणि हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. वाढत्या उन्हामुळे तहानलेल्या प्राण्यांची अवस्था बिकट होत असताना, याच पार्श्वभूमीवर एका माकडाने थेट सुरू असलेल्या सामन्याच्या व्यासपीठावर येत पाण्याची तहान भागवली.

सामना रंगात आला असताना अचानक एक माकड पाण्याच्या शोधात मैदानावर दाखल झाले. उपस्थित प्रेक्षक व खेळाडू क्षणभर चकित झाले, मात्र कुणीही त्याला त्रास न देता शांतपणे परिस्थिती हाताळली. त्या माकडाची तहान ओळखून एका व्यक्तीने पुढे येत त्याला पाण्याची बाटली दिली.

विशेष म्हणजे, माकडाने कोणतीही भीती न बाळगता थेट बाटलीतून पाणी पिले आणि काही क्षणात तेथून निघून गेले. या घटनेने उपस्थितांमध्ये मानवता आणि प्राण्यांप्रती सहानुभूतीचा संदेश दिला.

उन्हाचा प्रचंड तडाखा वाढत असताना वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
माजी आमदार राजेश पाटील यांनी केला NEET टॉपर सार्थकचा गौरवसीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौराबेळगावात रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; प्रशासनावर सवाल*मोबाईलच्या कारणावरून मित्राचा जीव घेतला; मंदिरातच घडली थरारक हत्या**सोनम वांगचूक रुग्णालयात; पत्नी गीतांजलींची औषधांबाबत स्पष्ट भूमिका**SIR सर्वेक्षणातील अडचणींबाबत किरण जाधवांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे धाव**बेळगावातील हनुमान मंदिरात माकडाचा शांत वावर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल**संवेदनशीलता-जीवनानुभव यांच्या मिलाफातूनच खरी कविता जन्माला येते : कवी शिवाजी शिंदे**इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान**युनियन जिमखान्यावर लष्कराचा ताबा; न्यायालयीन निर्णयानंतर अंमलबजावणी*