LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत यादी जाहीर; लक्ष्मण सवदींना मंत्रिपद*

कर्नाटकातील डी.के. सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर काँग्रेस हायकमांडची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या मान्यतेनंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र पाठवून 20 नव्या मंत्र्यांच्या नावांना हिरवा कंदील दिला आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज सायंकाळी होण्याची शक्यता आहे.

या विस्तारात अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले असून, यापूर्वीच मंत्री असलेले सतीश जारकीहोळी यांच्यासह जिल्ह्याला आता दोन मंत्री मिळाले आहेत.

याशिवाय पंचमसाली समाजाचे प्रमुख नेते विजयानंद काशप्पनवर यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. सामाजिक, प्रादेशिक आणि राजकीय समतोल राखण्याच्या उद्देशाने काँग्रेस हायकमांडने हा विस्तार केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मंत्रिपदासाठी मंजूर झालेल्या 20 आमदारांची यादी
पी. एम. नरेंद्रस्वामी
शिवराज तंगडगी
रुद्रप्पा लामाणी
के. एस. बसवंतप्पा
बी. नागेंद्र
टी. रघुमूर्ती
बी. झेड. झमीर अहमद खान
रिझवान अर्शद
संतोष लाड
मधु बंगारप्पा
पुत्तरंगशेट्टी
मंकाळा वैद्य
डॉ. अजय सिंह
एन. चलुवराय स्वामी
के. एम. शिवलिंगे गौडा
एच. सी. बालकृष्ण
गायत्री शांतगौडा
बसवराज रायरेड्डी
विजयानंद काशप्पनवर
लक्ष्मण सवदी

याशिवाय विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठीही स्वतंत्र प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता नव्या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*