LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचे साहित्यिक मावळे तंजावरकडे रवाना!*

 

बेळगाव : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा दक्षिण भारतात जपणाऱ्या ऐतिहासिक तंजावर नगरीत दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सरफोजीराजे भोसले (द्वितीय) मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगावचा साहित्यिक चमू तंजावरकडे उत्साहात रवाना झाला.

डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले, तंजावर हे आहेत. तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत मराठी साहित्याचा जागर घडविणाऱ्या या संमेलनात बेळगावच्या साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींचा सहभाग विशेष ठरणार आहे.

🌺 बेळगावकरांचा विशेष सन्मान

या संमेलनासाठी विशेष अतिथी म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील आणि विशेष अतिथी आप्पासाहेब गुरव यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच प्रमुख पाहुणे ॲड. सुधीर चव्हाण यांच्यासह बेळगावच्या विविध क्षेत्रांतील साहित्यिक व साहित्यप्रेमींची उपस्थिती राहणार आहे.

बेळगावच्या या साहित्यिक चमूमध्ये कवी व्यं. कृ. पाटील, कवी रामदास बिर्जे, शिवसंत संजय मोरे या कवींना कविसंमेलनात निमंत्रीत करण्यात आले आहे 

यावेळी विलास पवार, उद्योजक टोपाणा पाटील, संजय गुरव, ॲड. एन. डी. पाटील, ॲड. महेश कदम, प्रा. रमेश भोसले, लेखक नितीन आनंदाचे, नारायण कणबरकर, मोहन पाटील सर, सुभेदार के. आर. मोटर, शिवाजी खांडेकर, सयाजीराव सावंत, शशिकांत अष्टेकर, कृष्णा गवंडी, मोहन मन्नोळकर, रघुनाथ पाटील, तानाजी पाटील, रामलिंग देसाई, मारुती पाटील, दिलीप चव्हाण, मनोहर संताजी आदींचा समावेश आहे.

🚩 तंजावरकडे निघाले साहित्यिक मावळे!

बेळगाव ते तंजावर हा प्रवास केवळ साहित्य संमेलनाचा नसून मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि तंजावरच्या मराठी वारशाशी नाते दृढ करणारा सांस्कृतिक प्रवास ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या आणि भोसले घराण्याच्या ऐतिहासिक परंपरेच्या साक्षीदार असलेल्या तंजावर भूमीत मराठी साहित्याचा जागर करण्यासाठी बेळगावचा हा साहित्यिक चमू उत्साहाने मार्गस्थ झाला आहे.

“तंजावर संमेलनासाठी निघाले मावळे…

तंजावर संमेलनात होणार बेळगावचा सन्मान…

आणि साहित्यिकांच्या कार्याचा होणार गौरव!”

अशा उत्साहपूर्ण वातावरणात बेळगावचा साहित्यिक चमू तंजावरकडे रवाना झाला असून, दि. २३ सप्टेंबरचा तंजावर साहित्य सोहळा मराठी साहित्यविश्वासाठी संस्मरणीय ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचे साहित्यिक मावळे तंजावरकडे रवाना!**मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक**खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?**मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती**कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत