Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*बेल्लारीत भाजपची ‘चलो बल्लारी’ पदयात्रा; काँग्रेस सरकारविरोधात जोरदार एल्गार*

 

बेल्लारी : काँग्रेस सरकारच्या कथित भ्रष्टाचार, जनविरोधी धोरणे आणि कारभाराविरोधात भाजपने सुरू केलेल्या ‘बल्लारी चलो’ पदयात्रेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कुडितिनी येथून बेल्लारीपर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.


पदयात्रेदरम्यान काँग्रेस सरकारच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारच्या धोरणांबाबत जनतेमध्ये असलेल्या नाराजीचा आवाज या आंदोलनातून बुलंद करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला.


या पदयात्रेत सी. टी. रवी, सी. सी. पाटील, एम. पी. रेणुकाचार्य, श्रीकांत कुलकर्णी, हरीश पूंजा, बी. श्रीरामुलू, किशोर कुमार पुत्तूर, सुभाष पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले.


जनतेचा प्रतिसाद ठरला चर्चेचा विषय
कुडितिनी ते बल्लारी या मार्गावर पदयात्रेला नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा भाजप नेत्यांनी उल्लेख केला. विविध ठिकाणी नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत करून सहभागी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला.


जनतेचा हा प्रतिसाद पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारा असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. काँग्रेस सरकारच्या कारभाराविरोधातील जनभावना अधिक व्यापक करण्यासाठी आंदोलन पुढे नेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.


दरम्यान, ‘जनतेमध्ये जागृती निर्माण करून कर्नाटकला काँग्रेसमुक्त करण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवू’, असा संदेश भाजप नेत्यांनी दिला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चंदगड तालुका शासकीय कबड्डी स्पर्धेचे राजगोळी बु. येथे शानदार उद्घाटन* *१४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांत रंगणार दोन दिवस कबड्डीचा थरार**जक्केरी होंडा विसर्जन तलावाच्या तयारीचा नगरसेवक नितीन जाधव यांच्या कडून आढावा गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात; जक्केरी होंडा तलावाची पाहणी**नवरत्न सन्मानाने...श्री गणेश फेस्टिवलची यशस्वी सांगता**बेल्लारीत भाजपची ‘चलो बल्लारी’ पदयात्रा; काँग्रेस सरकारविरोधात जोरदार एल्गार**मोबाईल-टीव्हीपेक्षा पुस्तकांना द्या वेळ; ध्येय निश्चित करून मेहनत करा – लक्ष्मी हेब्बाळकर**बेळगाव विशेष वार्तांकन शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी ‘मॉन्टी फाउंडेशन’चा निर्धार!* *मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देणे गरजेचे : अविनाश भोसले**महादान २०२६’ अंतर्गत रक्तदानासह अवयवदान, नेत्रदान व देहदान जनजागृती अभियान विनायक नगर येथे २० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन**सायबर सुरक्षेचा धडा! मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य**22 वी खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीची छापेमारी; कर्नाटक-महाराष्ट्रात सुमारे 15 ठिकाणी झडती*