LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?*

खानापूर तालुका BEO ऑफिसला गेली दोन महिने कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षण क्षेत्राची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमातून याबाबत बातमी वाचल्यानंतर खानापूर युवा समितीचे अध्यक्ष तथा युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी खानापूर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट दिली असता ही माहिती समोर आली.

यापूर्वी येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामाप्पा हे दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदावर कोणाचीही कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या गट समन्वयक अधिकारी मंजुनाथ हत्ती यांच्याकडे केवळ प्रभारी (इन्चार्ज) म्हणून या पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे, अशी माहिती येथील व्यवस्थापक प्रकाश होसमनी यांनी दिली.

शिक्षण क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून खानापूर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा व दुर्गम भागाने व्यापलेला आहे.मंजुनाथ हथी यांच्याकडे बीआरसी चाही अधिभार असल्याने तालुक्याला पूर्ण वेळ देणे कठीण आहे, त्यामुळे येथे कायमस्वरूपी अधिकारी असणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने शिक्षकांच्या, शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अनेक कामांमध्ये अडथळे येत आहेत.

या संदर्भात येत्या एक-दोन दिवसात जिल्हा शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन खानापूर तालुक्याला तात्काळ कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नेमण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी नियुक्ती होत नाही,तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक**खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?**मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती**कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत*बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांसाठी पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; विसर्जनावर विशेष लक्ष*