LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता

KLE आयुर्वेदिक रुग्णालयामागील घटनेत राष्ट्रीय पक्ष्याला जीवदान; भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नागरिकांची चिंता

बेळगाव : शाहापूर येथील KLE आयुर्वेदिक रुग्णालयाच्या मागील परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मोर जखमी झाल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच Social Worker Rescue Team Belgaumच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी मोराची सुटका केली.
जखमी मोराला भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढून टीमच्या सदस्यांनी उपचारासाठी कोल्हापूर सर्कलजवळील Soulmate Pet Clinic येथे नेले. तेथे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी मोरावर तातडीने प्राथमिक उपचार केले. विशेष म्हणजे हे उपचार विनामूल्य करण्यात आले.
उपचारानंतर जखमी मोराला पुढील उपचार व पुनर्वसनासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
या बचावकार्यामध्ये अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, विकी मेहता, प्रथमेश साळोखे आणि धीर मेहता यांनी तत्परतेने सहभाग घेतला.
दरम्यान, या घटनेमुळे बेळगाव शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांसोबतच शहरातील वन्यजीव आणि पक्ष्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी तसेच नागरिक आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित प्रशासनाने प्रभावी उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत*बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांसाठी पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; विसर्जनावर विशेष लक्ष**गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात RAF चे पथसंचलन; सुरक्षा व्यवस्था कडक**तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचा ३० जणांचा चमू सज्ज! यश ॲटो येथे शुभेच्छा कार्यक्रम; रायगड व राजगड टीम २१ सप्टेंबरला रवाना**यल्लम्मा देवीच्या डोंगरावर दुकानांवर धाडी; औषधांची विक्री आणि निकृष्ट खाद्यपदार्थ उघड**सारथी नगर, पोलीस कॉलनीत ₹1.25 कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात; लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांना यश**शाहूनगरात विघ्नहर्ताच्या महाआरतीचा सोहळा; संदेश राजमाने यांचा मंडळाकडून सन्मान*देवस्थान संस्कृतीने जगाला आकर्षित केलेले भव्य राष्ट्र भारत : मनोहरजी मठदकर्नाटकातील विद्यार्थ्यांना दसऱ्याची १९ दिवसांची सुटी; २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू