LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद*


 बेळगाव ता,22.टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या बेळगाव शहर तालुकास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा शाळेने बलाढ्य सेटपाल्स शाळेला नमवित तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने भरतेश इंग्लिश मीडियम स्कूलचा 3-0 असा पराभव केला विजयी संघाच्या संचित धामणेकर, श्रेयस चंदन, हरीष पिरजादे यांनी गोल केले, दुसऱ्या उपात्य सामन्यात सेट पाल्स शाळेने कनक मेमोरियल स्कूलचा 4-0 असा पराभव केला विजयी संघाच्या आराध्या नाकाडी व सकलेन मुल्ला यांनी प्रत्येकी 2 गोल केले.तर अंतिम सामना संत मीरा वि सेट पाल्स या दोन संघात झाला खेळाच्या पहिल्या सत्रात गोल फरक कोरा राहिला,दुसऱ्या सत्रात सेटपाल्स शाळेला  पेनल्टी शूटआउट मिळाली त्यावर गोल करित 1-0 अशी बढत मिळविली, तर खेळ संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना संत मीराच्या रत्नाकरने गोल करीत संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली.

 निर्धारित वेळेत गोल 1-1 असा बरोबर राहिल्याने पंच कौशिक पाटील यांनी पेनल्टी शूटआउटचा अवलंब केला यात दोन्ही संघानी 3-3 गोल केले शेवटी सडनडेथचा अवलंब करण्यात आला यात संत मीरा शाळेने बलाढ्य सेट पाल्सला 6-5 असा पराभव करीत विजेते पटकाविले,
 विजयी संघाच्या समर्थ पानारी,रक्षित रामगोंडा,रेहान अख्तर,रत्नाकर गौतम, अनिरुद्ध हलगेकर तर सेट पाल्सतर्फे अब्दुल मतीन सय्यद, नवीन पत्की, सुमित गंगेकर, आराध्या नाकाडीने दोन गोल केले, तर सेट पाल्सच्या सकलेन मुल्ला हर्षित रेवणकर यांनी चेंडू गोल पोस्टच्या बाहेर मारला.

 आता वरील संत मीरा फुटबॉल संघ आगामी होणार्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे नागराज भगवण्णावर, अंन्थोनी डिसोजा,जयसिंग धनाजी, बापू देसाई या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 चौकट
 सेट पाल्सचा सलग तिसरा पराभव.
 मागील दोन वर्षात संत मीरा शाळेने बलाढ्य सेट पाल्स शाळेला सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय स्पर्धेत सलग दोन वेळा पराभूत केले तसेच फादर एड फुटबॉल स्पर्धेत ही त्यांना पराभवाचा धक्का दिला आहे 
या विजयानी  संत मीरा शाळेच्या  फुटबॉल संघातील  खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?**मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती**कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत*बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांसाठी पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; विसर्जनावर विशेष लक्ष**गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात RAF चे पथसंचलन; सुरक्षा व्यवस्था कडक*