LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News | Politics News

*मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक*

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाची संयुक्त बैठक गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पार पडली.

 या बैठकीत सीमाभागातील सद्यस्थिती, मराठी शाळांसमोरील प्रश्न, युवकांचे संघटन तसेच आगामी काळातील आंदोलनाची दिशा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान सीमाभागातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना मराठी भाषा, मराठी शाळा आणि सीमाप्रश्नाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात विविध घटक समित्या आणि युवा समित्यांच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पुणे विभाग समितीने केलेल्या कार्याचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

युवकांना अधिक संधी देण्याची मागणी


पुणे विभाग समितीच्या कार्यकर्त्यांनी संघटनेत युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली. मध्यवर्ती समितीने युवकांना संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना कार्य करण्याची अधिक संधी द्यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

यावर खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच घटक समित्या नेहमीच युवकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. युवकांचा मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक कार्यात सहभाग असून, आगामी काळातही युवकांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबविले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा

पुणे विभाग समितीच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, घटक समित्या आणि युवा समित्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारकडे सीमाप्रश्नाबाबत पाठपुरावा सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची भूमिका पुणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

बैठकीत संघटनात्मक कार्याचा विस्तार, विविध घटक समित्यांमधील समन्वय आणि युवकांचा सहभाग वाढविणे यावरही चर्चा झाली. सीमाभागातील प्रश्नांबाबत जनजागृती वाढविण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. जी. पाटील, सुहास हुद्दार आदी उपस्थित होते.

तसेच पुणे विभागाचे विश्वनाथ पाखरे, गणपती पाटील, सातेरी पाटील, वैराळ सुळकर, भुजंग पाखरे, भारत पाखरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी आगामी काळात मध्यवर्ती समिती, घटक समित्या, पुणे विभाग आणि युवा समित्यांमध्ये समन्वय वाढवून संघटनात्मक कार्य अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक**खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?**मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती**कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत*बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांसाठी पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; विसर्जनावर विशेष लक्ष*