LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत हट्टीहोळींचे महत्त्वाचे वक्तव्य*


गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात पुन्हा पावसात खंड पडल्यास आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाची कमतरता आणि दुष्काळाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता जिल्हाभर पावसाला सुरुवात झाल्याने परिस्थितीत सुधारणा होत आहे.

येत्या काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास कृषी, ग्रामीण विकास, शिक्षण आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक खबरदारीची पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे, यावर्षी जिल्ह्यात खतांचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला. मागील वर्षी खतांच्या कमतरतेमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदा केंद्र सरकारकडून पुरवठा मर्यादित ठेवण्याचे आवाहन असले तरी राज्य आणि जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना हट्टीहोळी म्हणाले की, SIR प्रक्रिया पूर्ण होताच ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

सध्या ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासकांकडून सुरळीतपणे सुरू असून, काही ठिकाणी किरकोळ अडचणी असल्या तरी त्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*