Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; KLE लॉ कॉलेजमध्ये वार्षिक सोहळा*

KLE सोसायटीच्या बी. व्ही. बेल्लद लॉ कॉलेज, बेळगाव येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाधर के. एन. उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी विधी व्यवसाय हा प्रामाणिकपणा, निष्ठा आणि न्यायभावना यांवर आधारित एक प्रतिष्ठित व्यवसाय आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी कायद्याचे सखोल ज्ञान आत्मसात करून नैतिक मूल्ये जपत समाजातील गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ आर. बी. बेल्लाड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रमुख पाहुणे हे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त केला. त्यांच्या यशस्वी प्रवासातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन चिकाटी, परिश्रम आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचा आदर्श ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती जी. हिरेमठ यांनी पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला. महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षा सौ. सविता पटणशेट्टी यांनी वार्षिक अहवाल सादर करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक यश, विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थी, मूट कोर्ट स्पर्धा, विधी सहाय्य उपक्रम, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध विद्यार्थी विकास उपक्रमांचा आढावा घेतला.

महाविद्यालयाचे सरचिटणीस साईराज आंबळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला जिमखाना अध्यक्षा डॉ. ऋचा राव, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*