Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*पाईपलाईनच्या कामानंतर रस्ता बेवारस; कंग्राळी बुद्रुकमधील खड्ड्यामुळे वाहनचालक हैराण*

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावातील चव्हाटा चौक परिसरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेला सीसी रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर योग्य पद्धतीने पूर्ववत करण्यात न आल्याने मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांची मालिका सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला भाग व्यवस्थित भरून न काढल्याने रस्त्यावर धोकादायक खड्डा तयार झाला. विशेषतः कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना या खड्ड्याचा मोठा फटका बसत आहे.

ग्रामस्थांच्या दाव्यानुसार, या ठिकाणी आतापर्यंत तीन अपघात घडले असून अनेक वाहने खड्ड्यात अडकण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत आणि बांधकामाशी संबंधित यंत्रणेला त्वरित कारवाई करून रस्ता सुरक्षित करण्याचे आवाहन केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
किल्ला तलावाची अमान सेठ यांच्याकडून पाहणी; प्लास्टिक कचऱ्यावर चिंता*स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत हट्टीहोळींचे महत्त्वाचे वक्तव्य**आणखी 4-5 दिवस जोरदार पाऊस झाला तर दुष्काळाची भीती नाही; मंत्री सतीश जारकीहोळी यांचा दिलासा**मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ.श्रुती पानसे यांची प्राथमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन संवाद कार्यशाळा संपन्न**ARS फाउंडेशनकडून 600 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप**पाईपलाईनच्या कामानंतर रस्ता बेवारस; कंग्राळी बुद्रुकमधील खड्ड्यामुळे वाहनचालक हैराण**गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; KLE लॉ कॉलेजमध्ये वार्षिक सोहळा**भडगाव पुलावरील पर्यायी मार्ग बंद; मुसळधार पावसाचा मोठा फटका**बेळगाव-गोवा मार्गावर चिखलात बस अडकली; प्रवाशांनीच केली सुटका**बेळगांव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 4.78 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त*