Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

खानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी

किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत; मारीहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

बेळगाव : तालुक्यातील खानगाव येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुशांत बाळेश कणबरकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, खानगाव येथे जमिनीच्या संदर्भातून सुरू असलेल्या वादातून संबंधित व्यक्तींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत जाऊन हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेप्रकरणी सीद्राय परशुराम कणबरकर, महेश सीद्राय कणबरकर, रोहित सीद्राय कणबरकर, एका नगरकर, रेणुका सीद्राय कणबरकर आणि बन्नू पाटील यांनी सुशांत बाळेश कणबरकर व बाळेश कणबरकर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारामारीत सुशांत कणबरकर जखमी झाले.

जखमी सुशांत यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतची पुढील माहिती उपलब्ध झालेली नाही.

दरम्यान, या प्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
खानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी**आजी माजी लोकप्रतिनिधींच्या सुंदोपसुंदीतुन खानापूर तालुक्यातील जनतेने बोध घ्यावा*